तुंबाड - चाकोरीबाहेरील सिनेमा
कण-कण कोई कनक, कोई भनक, कानों कान दिया | धन-धन ये जो धनक, ये जो खनक, धरा छान लिया | अरे आओ ना तुम्बाड़ जोगना है तुम्हें रे अरे जाओ ना तुम्बाड़ भोगना है तुम्हें रे अजय-अतुल च्या भन्नाट संगीताच्या लयीवर अतुल ने गायलेले हे सनसनाटी टायटल सॉंग जेंव्हा सिनेमागृहात वाजते तेंव्हा अक्षरशः शरीरातील रोमा रोमात एक थरार - एक जोश आपोआपच थिरकू लागतो. हृदय जणू गाण्याच्या ठेक्यावर धडधडू लागते. ऐकताना 'फँड्री' मधील अजय-अतुलचे 'पिरतीचा हा इंचू मला चावला...' किंवा 'चांग भलं...' या गाण्यांची आठवण येते तरी सुद्धा 'तुंबाड' चा वेगळेपणा संगीताच्या माध्यमातून रहस्यमयी वातावरण साकारण्याचे कसब अजय-अतुल यांनी उत्तमरीत्या सांभाळले आहे यात शंकाच नाही. जोडीला बॅग्राऊंड स्कोर दिलाय जेस्पर कीड या डॅनिश म्युझिक कंपोझर आणि साऊंड डिझायनरनी ज्याने 'असॅसिन क्रीड' सारख्या व्हिडीओ गेमला म्युझिक दिले आहे तसेच असे कैक हिट सिनेमाझ,गेम सिरीज साठी त्याचे नाव प्रचलित आहे. भारतीय थरार चित्रपटांच्या श्रेणीत 'तुंबाड' चे संगीत नक्कीच अविस्मरणीय आहे. कानात ते सतत वाजत राहत